लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : कुर्ला (प.) येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील लाकडाच्या वखारींना सोमवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या आगीत लाकडाच्या पाच ते सहा वखारी जळून खाक झाल्या.

आणखी वाचा-मुंबई : वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा

लालबहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला गार्डन परिसरातील लाकडाच्या एका वखारीला सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. वखारीमधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र लाकडांमुळे आगीचा भडका उडाला. कर्मचाऱ्यांनी तत्काळ आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. अन्य चार – पाच गोदामे आगीच्या विळख्यात अडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र आगीत लाकडाच्या पाच ते सहा वखारी भस्मसात झाल्या.