मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेकडे लाकडाच्या दुकानांना लागलेली आग विझलेली नसताना दुपारी मालाडमध्ये एका झोपडपट्टीत आग लागली. काही मिनिटांतच ही आग भडकली व अग्निशमन दलाने तिसऱ्या क्रमांकाची वर्दी दिली.

हेही वाचा – Video: “शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ केलेल्या व्हिडीओचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये…”; नितेश राणेंचे ठाकरे गटावर गंभीर आरोप

हेही वाचा – “…म्हणून भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत”, अजित पवारांचा मोठा दावा

मालाड पूर्वेकडील आप्पा पाडा परिसरात आनंद नगर झोपडपट्टीत सोमवारी संध्याकाळी पाच वाजता आग लागली. काही वेळातच ही आग भडकली असून अद्याप आग विझवण्याचे काम सुरू आहे.