मुंबई : गटाराचे खोदकाम सुरू असताना फुटलेल्या गॅस वाहिनीतून झालेल्या गॅस गळमुळे चेंबूरमध्ये मंगळवारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र एक झाड जळून खाक झाले.
हेही वाचा >>> वस्तू-सेवा कराच्या परताव्याचा लाभ घरखरेदीदारांना देणे बंधनकारक! नफेखोरी प्राधिकरणाकडे दाद मागता येणार
गेल्या काही दिवसांपासून चेंबूरच्या आर. सी. मार्गावरील चेंबूर पोलीस ठाण्याजवळ मुंबई महानगरपालिकेमार्फत गटारांची कामे करण्यात येत आहेत. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जेसीबीच्या मदतीने येथे खोदकाम करण्यात येत होते. याच वेळी जमिनीखालून गेलेल्या गॅस वहिनीला जेसीबीचा धक्का लागला. परिणामी, गॅस गळती होऊन मोठी आग लागली. येथील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.