मुंबईतील वांद्रे परिसरात एलपीजी गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती मुंबई महापालिकेनं दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वांद्रे येथील गाझधर बंध मार्गावरील फिटर गल्लीत शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास एका बैठ्या घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या आगीच्या ज्वाळां विजेच्या संपर्कात आल्यामुळे आग वाढू लागली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत ६ वाजून ४० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या दुर्घटनेत निखिल दास (वय ५३), राकेश शर्मा (वय ३८), अँथनी थेंगल (वय ६५), कालीचरण कनोजिया (वय ५४) आणि शान सिद्दिकी (वय ३१) हे पाचजण होरपळले असून त्यांना नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.