मुंबई : माथेरानची राणी अर्थात ‘मिनी ट्रेन’ला विस्टाडोम डबा जोडला नसल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. बुधवारपासून माथेरानच्या राणीची सफर सुरू झाली. मिनी ट्रेनला ‘विस्टाडोम’ डबा जोडला जाईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, प्रत्यक्षात ‘विस्टाडोम’ डब्याविनाच मिनी ट्रेनचा प्रवास सुरू झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

मध्य रेल्वेची ११७ वर्षांची नेरळ-माथेरान मिनी टाॅय ट्रेन भारतातील पर्वतीय रेल्वेपैकी एक आहे. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. तसेच २०१९ मध्ये नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या विस्टाडोम डब्याचे लोकार्पण केले. विस्टाडोम डबा जोडल्याने, पर्यटक अधिक मिनी ट्रेनकडे ओढले गेले. पारदर्शक काचेच्या खिडक्या आणि छत असलेल्या विस्टाडोम डब्यातून संपूर्ण निसर्गरम्य वातावरण पाहता येते. तसेच डब्याच्या आतील भागात सेल्फीसाठी विशेष जागा आहे. आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, रंगीबेरंगी एलईडी विद्युत दिवे, एलईडी टीव्ही स्क्रीन, नक्षीदार लाकडी फर्निचर अशा अनेक सुविधा या विस्टाडोममध्ये अंतर्भूत असल्याने, पर्यटक जादा तिकिटांचे पैसे खर्च करून, विस्टाडोम डब्याने प्रवास करत होते. मात्र, गेल्या काही कालावधीपासून मिनी ट्रेनचा डबा गायब असल्याने, पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”

हेही वाचा – कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू

दरवर्षी पावसाळ्यात नेरळ-माथेरानची थेट सेवा बंद केली जाते. यावर्षी ८ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत ही नेरळ ते अमन लाॅज सेवा बंद करण्यात आली होती. तर, हा कालावधी ५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांसाठी फक्त माथेरान ते अमन लाॅज दरम्यान शटल सेवा सुरू होती. तर, ६ नोव्हेंबरपासून नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू झाली. मिनी ट्रेन सुरू झाल्याची माहिती मिळताच माथेरानला जाण्याचे नियोजन केलेल्या पर्यटकांनी नेरळ स्थानकातील तिकीट खिडकीवर तिकिटासाठी गर्दी केली होती. त्यानुसार सकाळी नेरळहून ८.५० वाजता पहिली ट्रेन नेरळ ते माथेरान दरम्यान चालविण्यात आली. यानंतर सकाळी १०.२५ वाजता नेरळ माथेरान दरम्यान दुसरी गाडी धावली.

नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा विस्टाडोम डबा नियमित दुरुस्तीसाठी परळ येथील कारखान्यात पाठवण्यात आला आहे. साधारणपणे एका महिन्याने हा डबा मिनी ट्रेनला जोडला जाईल. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा – कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर

मुंबई, ठाणे आणि पुणे येथील पर्यटकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तसेच, नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन म्हणजेच माथेरानची राणी पर्यटकांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात थेट नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद होती.