पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या माथेरानचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ३० डिसेंबर रोजी सर्वसामान्य नागरिक ‘धाव’ घेणार आहेत. या थंड हवेच्या ठिकाणाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी ‘इकोफोक्स’तर्फे ‘माथे-रन’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
माथेरानच्या संरक्षणासाठी ‘माणूस आणि पर्वत भेट’ संकल्पनेतून २५ डिसेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ३० डिसेंबर रोजी त्यांची सांगता होईल. या कार्यक्रमादरम्यान छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले असून माथेरानमधील जैवविविधता आणि येथील वारशाचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून दर्शन घडणार आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्याचा संदेशही या मोहिमेदरम्यान देण्यात येणार आहे.
माथेरानच्या संवर्धनासाठी ३० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता दस्तुरी नाका येथून ‘धाव’ मोहीम सुरू करण्यात येणरा असून त्याची सांगता माथेरान (पांडे मैदान) येथे होईल. या कार्यक्रमामध्ये पर्यावरणप्रेमी, माथेरानचे अभ्यासक, पर्यटक, स्थानिक लोकप्रतिनिधी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत.
माथेरानचे संरक्षण आणि संवर्धनाबाबतच्या कृती आराखडय़ाबाबत यावेळी माहिती देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी http://www.ecofolks.com/mm अथवा info@ecofolks.com वर मेल करावा अथवा ८४३३२४९४९४, ९२२०२७७०११ वर संपर्क साधावा.
सर्वसामान्यांची माथेरानसाठी माथे‘रन’
पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या माथेरानचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ३० डिसेंबर रोजी सर्वसामान्य नागरिक ‘धाव’ घेणार आहेत. या थंड हवेच्या ठिकाणाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी ‘इकोफोक्स’तर्फे ‘माथे-रन’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 28-12-2012 at 03:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matheran run for common man