शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाईने केली. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. घोसाळकर यांच्या हत्येच्या आधी मॉरिसने त्यांच्याबरोबर फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्हमध्ये त्याने जे शब्द उच्चारले ते सूचक होते. त्याची आता चर्चा होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली. त्याआधी मॉरिसने काही शब्द उच्चारले होते. तसंच अभिषेक घोसाळकर यांनीही आम्ही आता एकत्र आलो आहोत आणि दहिसर बोरीवलीतल्या गरीब लोकांसाठी काम करणार आहोत असं म्हटलं होतं.

हे पण वाचा- Mauris Noronha: अभिषेक घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा कोण होता?

नेमकं प्रकरण काय?

मॉरिस नोरोन्हा हा दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत होता. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस हा एक स्वयंघोषित नेता म्हणून ओळखला जात होता. अभिषेक घोसाळकर यांनी गुरुवारी (८ फेब्रुवारी) संध्याकाळी मॉरिसबरोबर फेसबुक लाइव्ह केलं होतं. या फेसबूक लाईव्हदरम्यान, मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अभिषेक घोसाळकर फेसबूक लाइव्हद्वारे लोकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे.” हा संवाद संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून उभे राहिले. त्याचवेळी मॉरिसने त्यांच्यावर सलग पाच गोळ्या झाडल्या.

गोळीबार करण्यापूर्वी काय म्हणाला होता मॉरिस?

गोळीबार करण्यापूर्वी जेव्हा मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र बसले होते तेव्हा ‘आज बहुत सारे लोग सरप्राईज होंगे’ असं वक्तव्य मॉरिस मोरोन्हाने केलं होतं. त्या फेसबुक लाईव्हमधल्या या वाक्याचा उलगडा या घटनेनंतर झाला आहे. कारण फेसबुक लाईव्ह संपल्यावर अभिषेक घोसाळकर उठून जात असताना मॉरिसने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पाच गोळ्या लागलेल्या घोसाळकरांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आणि आयुष्य संपवलं.