मुंबई : सकाळपासूनच वाढणारा असह्य उकाडा आणि सकाळी ११ पासून सायंकाळपर्यंत होणारी लाहीलाही असा अनुभव सध्या मुंबईकरांना येत आहे. उकाड्यातून सुटका होणे दूरच, उलट तो वाढण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर तसेच उपनगरांत गेल्या आठवड्यात मुसळधार कोसळला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. वातावरणाच्या उष्णतामानात वाढ होत आहे. यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत असून, वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे. या स्थितीत पुढील तीन ते चार दिवस मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
Pune Video young people of which district live most in pune
Pune Video : पुण्यात कोणत्या जिल्ह्यातील सर्वात जास्त तरुणमंडळी आहेत? नेटकऱ्यांनीच दिले उत्तर
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

हेही वाचा – आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी

हेही वाचा – मुंबई : खासदार पुत्राच्या मोटरगाडीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी, गणेश हंडोरे अटकेत

दरम्यान, मुंबईबरोबरच राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून शनिवारी मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासास पोषक वातावरण असल्याने पुढील दोन – तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांतून मोसमी वारे परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.

Story img Loader