सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यामध्ये गेली सात-आठ वर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी सूचना प्रशासनाला करीत महापौर सुनील प्रभू यांनी या कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली.सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत विविध पदांवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी महापौरांच्या दालनात सोमवारी संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौरांनी वरील सूचना केली.गेली सात-आठ वर्षे हे कर्मचारी उत्तम प्रकारे काम करीत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रणालीत समावेश या सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. हे कर्मचारी पालिकेच्या शिक्षण खात्यास पूरक म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावित आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचा विचार करून त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, असे आदेशही त्यांनी उपस्थित पालिका अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा