‘बॉस’ या स्वदेशी संगणकीय प्रणालीचा अवलंब; खुल्या कार्यप्रणालीमुळे प्रयोगशीलतेला वाव
आम्ही ‘विंडोज’ नव्हे तर ‘बॉस’ ही ऑपरेटिंग प्रणाली शिकवतो. आमच्याकडे ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ नाही तर ‘ओपन ऑफिस’चा वापर होतो. आम्हाला ‘अँटी व्हायरस’ची गरज भासत नाही. इतकेच काय तर आम्ही शैक्षणिक उपयोगासाठी आवश्यक ती सर्व सॉफ्टवेअरही वापरू शकतो. मग काय हरकत आहे मायक्रोसॉफ्टला हद्दपार करायला?.. माझगावच्या सेंट मेरीज शाळेतील शिक्षकांचा हा सवाल खरोखरच बिनतोड आहे. या शाळेने संगणकांमध्ये ‘विंडोज’ऐवजी स्वदेशी संगणकीय कार्यप्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
विंडोज या मायक्रोसाफ्ट निर्मित ऑपरेटिंग प्रणालीचा लोगोचा सर्रास शालेय पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला होता. याचबरोबर मायक्रोसॉफ्टच्या इतर अॅप्सचाही यात समावेश होता. जणू जगभरात विंडोज म्हणजेच ऑपरेटिंग प्रणाली असे चित्र विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले होते. याला खुल्या ऑपरेटिंग प्रणालीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि यातून सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये संगणकाच्या खुल्या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर व्हावा यासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी एक परिपत्रक काढले होते. मात्र हे परिपत्रक फारशा शाळांपर्यंत पोहोचले नाही. या कार्यकर्त्यांनीच माहिती अधिकारातून ते परिपत्रक मिळवले व शाळांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात केली. यातूनच माझगाव येथील सेंट मेरी शाळेत हा प्रयोग झाला. यामुळे ही शाळा आता पूर्णत: खुल्या ऑपरेटिंग प्रणालीवर काम करणारी शाळा ठरली आहे. यापूर्वी कुर्ला येथील डॉन बॉस्को तंत्रशिक्षण संस्थेने पूर्णत: खुल्या ऑपरेटिंग प्रणालीवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी काम करून तेथील विद्यार्थ्यांनी अनेक यशस्वी प्रयोगही केले आहे. या दोन्ही संस्थांनी खुली ऑपरेटिंग प्रणाली निवडताना केंद्र सरकारच्या ‘भारत ऑपरेटिंग प्रणाली’(बॉस)चा स्वीकार केला आहे. ही ऑपरेटिंग प्रणाली सुरक्षित व सर्व सॉफ्टवेअर्सना उपयुक्त अशी आहे.
एखाद्या विदेशी कंपनीला त्यांची ऑपरेटिंग प्रणाली आणि सॉफ्टवेअर्स वापरण्यासाठी वर्षांला कोटय़वधी रुपये का द्यावे. हाच विचार करून जगभरात विविध ठिकाणी खुल्या ऑपरेटिंग प्रणालीची चळवळ उभी राहिली. यातून लिनक्स, उबंटू यांसारख्या ऑपरेटिंग प्रणालीचा जन्म झाला. याच काळात भारताने आपली स्वत:ची ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली आणि त्याला ‘भारत ऑपरेटिंग सिस्टीम’ (बॉस) असे नाव दिले. मात्र या ऑपरेटिंग प्रणालीची दखल फार कोणीही घेतली नाही. पण देशातील खुल्या ऑपरेटिंग प्रणाली कार्यकर्त्यांनी ही ऑपरेटिंग प्रणाली वापरली जावी यासाठी तगादा लावाला व विविध प्रयोगही करून दाखविले. ज्या वेळेस आम्ही प्रचलित मायक्रोसॉफ्ट सोडून खुल्या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला, त्या वेळेस आमच्या मनात थोडी भीती होती पण वापर सुरू झाल्यानंतर ती भीती पूर्णत: निघून गेल्याचे शाळेचे मुख्याध्यापक ज्युड फर्नाडिस यांनी सांगितले. ‘बॉस’चा स्वीकार केल्यामुळे परवान्यावर होणारा खर्च कमी झाला तसेच ही ऑपरेटिंग प्रणाली सुरक्षित असल्यामुळे अँटी व्हायरसवर होणारा खर्चही कमी झाल्याचे फर्नाडिस यांनी सांगितले. दैनंदिन कामात अडचण येते का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अडचण येत नाही फक्त आजपर्यंत हे वापरण्याचा सराव नसल्यामुळे सुरुवातीला सर्व नवीन वाटले पण आता सारे काही सरावले. तर जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थांनी तसेच सरकारी कार्यालयांमध्येही ‘बॉस’ या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर करावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, असे या ऑपरेटिंग प्रणालीचा प्रचार करणारे प्रा. मिलिंद ओक यांनी सांगितले.