एमबीए अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वाकोला येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली. सोनल बगारे (२४) असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती एमबीएच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होती़  ती आपल्या मावशीकडे राहात होती. आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खाली पडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आल़े  परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़    

Story img Loader