मुंबईः हैदराबादवरून मुंबईत आलेले १६ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत २४ कोटी रुपये असल्याची माहिती डीआरआयकडून देण्यात आली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यता आली.

दोन प्रवासी हैदराबादहून मुंबईत अमली पदार्थांचा साठा घेऊन येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी डीआरआने संबंधित बसवर पाळत ठेवली होती. बसमधील संशयी प्रवासी बाहेर पडल्यानंतर तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्याकडील बॅगेत पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळला. तपासणीत ते एमडी असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीनंतर आरोपींकडून १६ किलो एमडी जप्त करण्यात आले. आरोपींना मध्यस्थ व त्यांचा साथीदार मुंबईत भेटणार होते. त्यांच्याकडे एमडीची पाकिटे सुपूर्त करण्यात येणार होती, असे चौकशीत उघड झाले. या कारवाईनंतर डीआरआयने इतर आरोपींचाही शोध घेऊन मध्यस्थ व एमडी घेण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली. याशिवाय त्याच्याकडून एक कोटी ९३ लाख रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा >>>नववर्षात पुणेमुंबई प्रवास सुसाट, ठाणे खाडी पूल तीनच्या दुसऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण

एमडी भारतात सर्वाधिक विकले जाणारे अमली पदार्थ आहे. एमडीची २०१० दरम्यान प्रचंड विक्री वाढली होती. पण भारतात त्याला प्रतिबंधीत घोषित करण्यात आले नव्हते. त्यामुळे पोलिसांना कारवाई करणेही कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी भादंवि कलम ३२८ अंतर्गत एमडी विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. कलम ३२८ म्हणजे विषारी द्रव देणे अथवा विक्री करणे. त्यामुळे विक्रेत्यांवर तात्पुर्ती कारवाई होत होती. पण न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नव्हता. अखेर अमली पदार्थ विरोधी पथकात २०१४-१५ दरम्यान  एमडी अमली पदार्थ घोषित करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये एमडी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमली पदार्थ घोषित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत सातहून अधिक मेफेड्रोनचे (एमडी) कारखाने मुंबई पोलिसांनी उद््ध्वस्त केले.  यावर्षी सर्वाधिक म्हणजे साडेचारशे कोटी रुपयांचे एमडी पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केले. गंभीर बाब म्हणजे एमडीचे सेवन करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरूणांची संख्या अधिक आहे.

Story img Loader