पालिका प्रशासनाने परिपत्रक जारी करुन पर्युषण काळात चार दिवस घातलेल्या मांस विक्रीवर बंदीच्या विरोधात शिवसेनेच्या छत्राखाली विरोधक एकवटले. प्रशासनाने तात्काळ मांस विक्री बंदीबाबत जारी केलेले परिपत्रक मागे घेण्याची एकमुखी मागणी केली. भाजप नगरसेवकांनी नरोवा कुंजरोवा भूमिका घेत या बंदीचे काँग्रेसवर खापर फोडण्याचा प्रयत्न करीत स्वपक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौरांनी परिपत्रकाचा फेरविचार करण्याचे आदेश देत या विषयावरील हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
प्रशासनाने पर्युषण काळात १०, १३, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी पशुवधगृह बंद ठेवण्याचा आणि पालिकेच्या बाजारांमध्ये मांस विक्रीस बंदी करण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे पालिका सभागृहात या परिपत्रकाला विरोध केला. केवळ एका समाजासाठी इतरांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी शिवसेनेनेही या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा दिला.
मुंबईमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला महत्त्व असले तरी या काळात इतरांच्या खाण्यावर बंधने आणली जात नाहीत, असा टोला सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी भाजपचे नाव न घेता हाणला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा