भारतीय प्रशासन सेवेच्या १९८३च्या तुकडीतील मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तव या दोन सनदी अधिकाऱ्यांना राज्य शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे. दोन अतिरिक्त मुख्य सचिवपदाची दोन पदे रिक्त झाल्याने दोघांना बढत्या देण्यात आल्या आहेत. गाडगीळ सध्या गृह विभागात प्रधान सचिव (अपिल) या पदावर कार्यरत आहेत. हिवाळी अधिवेशन संपल्यावरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याने गाडगीळ यांच्याप्रमाणेच सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे ते सध्या कार्यरत असलेल्या वित्त विभागाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.

Story img Loader