मुंबईतील गोळीबार भागातील वस्त्या भुईसपाट करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी त्यांचे उपोषण शुक्रवारी रात्री मागे घेतले. गृहनिर्माण सचिव आणि मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाल्यामुळे उपोषण मागे घेतल्याचा संदेश त्यांनी शनिवारी सकाळी ट्विट केलाय. उपोषणाला पाठिंबा देणाऱया सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही भ्रष्टाचाराने बोकाळलेली असून, विकासकांच्या अत्याचारांना तोंड देण्याची वेळ लोकांवर आल्याचे पाटकर यांनी उपोषण सुरू असताना म्हटले होते. मुंबईतील सहा झोपडपट्टय़ांचे पुनर्वसन या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबबावे, अशी मागणी पाटकर यांनी केली होती. गोळीबार भागातील वस्त्या भुईसपाट करण्याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाटकर यांना दिले.
चौकशीच्या आश्वासनानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे
मुंबईतील गोळीबार भागातील वस्त्या भुईसपाट करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी त्यांचे उपोषण शुक्रवारी रात्री मागे घेतले.
First published on: 13-04-2013 at 12:55 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medha patkar ends his fast on slum demolition issue