राज्यातील नव्या सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीसाठी किमान चार हजार कोटी रुपये लागणार असून राज्याची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता हा खर्च करणे शासनाला शक्य नसल्यामुळे सार्वजनिक-खासगी भागीदारीतून वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्याबाबत अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विनियोजन विधेयकावरील चर्चेच्या उत्तरात सांगितले.
प्रामुख्याने चंद्रपूर व गोंदिया या नक्षलग्रस्त विभागात वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा निर्णय शासनाने घेतला असून त्याच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. सहा वैद्यकीय महाविद्यालयांची तीन वर्षांत उभारणी करण्यासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा खर्च असून तीन वर्षांत एवढा निधी उभारणे अवघड असल्यामुळे खासगी सहभागातून वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा