सन २०१४-२०१५ या कालावधीत सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील राखीव ठेवण्यात आलेल्या १५ टक्के जागांसाठी ४ मे २०१४ रोजी परीक्षा होणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केले आहे.
मागच्या वर्षी सर्व प्रवेश परीक्षा रद्द करून केंद्र सरकारने ‘नीट’ परीक्षा घेतली होती. मात्र याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर ही परीक्षा रद्दबातल ठरविण्यात आली होती. यानंतर यावर्षी पुन्हा जुन्या प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामुळे सर्व संबंधित शिक्षण विभागांनी परीक्षांची तयारी सुरू केली आहे. देशभरातील सर्व राज्यांमधील १५ टक्के जागा या केंद्रीय कोटय़ासाठी राखीव ठेवण्यात येतात. यासाठी घेण्यात येणारी ही प्रवेश परीक्षा असून याची अधिक माहिती  http://www.mciindia.org  या संकेतस्थळाला भेट द्या

Story img Loader