सामान्यपणे रेल्वेमंत्र्याच्या मतदारसंघात रेल्वेचा प्रकल्प सुरू केला जातो. तशाच प्रकारे गेल्या काही वर्षांत वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे येते त्या मंत्र्यांच्या मतदारक्षेत्रात वैद्यकीय महाविद्यालय सुरू  करण्याचा प्रस्ताव मांडला जातो. बरेच वेळा प्रभावशाली मंत्री आपल्याशी संबंधित मतदारसंघाच्या परिघात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतात. विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही उत्तर महाराष्ट्राचा विचार करून जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू  करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित महाविद्यालयासाठी ५८५ कोटी रुपये लागणार असून हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रासाठी आरोग्यदायी ‘मेडिकल हब’ ठरणार आहे.

यापूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांच्या बारामतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने मांडली होती. तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांच्याही मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव होता. विनोद तावडे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षणाचा कार्यभार असताना त्यांच्या बोरिवली मतदारसंघात ‘पीपीपी’ पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना मांडण्यात आली होती. आता गिरीश महाजन यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी येताच जळगाव येथे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मुंबई, पुणे अथवा नाशिककडे धाव घ्यावी लागू नये यासाठी थेट ‘वैद्यकीय हब’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि त्याला जोडून परिचारिका महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्य़ाची लोकसंख्या ४५ लाख एवढी असून भविष्यातील वाढ तसेच उत्तर महाराष्ट्राला सुपर स्पेशालिटी व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे बहुआयामी परिचारिका प्रशिक्षण केंद्र हा असून याअंतर्गत बीएस्सी नर्सिग, एमएस्सी नर्सिग, सायकियॅट्रिक, पेडियॅट्रिक, न्युरॉलॉजी, सीव्हीटीएस, नेफ्रॉलॉजी, बर्न व्यवस्थापन, जेरियॅट्रिक अशा एकूण २२ विषयांमध्ये परिचारिका अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. या परिचारिका अभ्यासक्रमासाठी एकूण १३५० जागा असून सुपरस्पेशालिटीसाठी चांगल्या परिचारिका या महाविद्यालयातून उपलब्ध होतील, असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगरे यांनी सांगितले.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
Story img Loader