लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न २२ वर्षे प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी, पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी, २५ जून रोजी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शारदा मंगल कार्यालय येथे सकाळी साडेदहा वाजता हा मेळावा होणार आहे.

गिरणी कामगार संघर्ष समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांच्यासह अन्य वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी धोरण जाहीर करावे, कोन (पनवेल) मधील घरांचा ताबा देण्यातील अडचणी दूर कराव्यात, सोडतीसाठी उपलब्ध घरांची दुरुस्ती करत सोडत काढावी, घरांचा ताबा देण्यास वेग द्यावा अशा गिरणी कामगारांच्या अनेक मागण्या आहेत. त्या पूर्ण करून घेण्यासाठी, आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of mill workers in dadar on sunday over housing issue mumbai print news dvr