पश्चिम रेल्वेवर अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेने सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या काळात मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत माहीम जंक्शन ते मरीन लाइन्स दरम्यान धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असणार आहे.
या दरम्यान चर्चगेटकडे येणारी धीम्या मार्गावरची उपनगरी गाडय़ांची वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार असून काही गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. १२ डब्यांची गाडी माहीम येथे दोन वेळा थांबेल. त्याचप्रमाणे माटुंगा रोड, एल्फिन्स्टन रोड, लोअर परळ आणि महालक्ष्मी या स्थानकांवर चर्चगेटकडे जाणाऱ्या गाडय़ा थांबणार नाहीत. त्यामुळे या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मुंबई सेंट्रल, दादर या स्थानकांवरून प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.
प्रवाशांचे मेगा हाल
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेने सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या काळात मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.
माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक या काळात जलद मार्गावर वळविण्यात आली असून विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा थांबणार नाहीत. या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर उतरून प्रवास करावा असे रेल्वेच्या पत्रकात म्हटले आहे.हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द दरम्यान दोन्ही दिशेने मेगा ब्लॉक करण्यात येणार असून या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेल दरम्यान विशेष गाडय़ा सोडण्यात आहेत.   

Story img Loader