उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी ३ मार्च रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेवर चार तासांचा मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात उपनगरी वाहतूक १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. हार्बर रेल्वेवर पनवेल आणि नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने १०.३५ ते ३.३५ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात सर्व उपनगरी वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली  आहे.

Story img Loader