मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी – मस्जिददरम्यान ब्लाॅकची मोठी मालिका सुरूच आहे. २५, २६, २७ जानेवारी आणि १, २, ३ फेब्रुवारी रोजी असा मोठा ब्लाॅकचे नियोजन होते. तर, आता आणखी दोन ब्लाॅकची भर पडली आहे. २८ जानेवारी रात्रकालीन ब्लाॅकचे नियोजन होते. तर, २९ जानेवारीला देखील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष आपत्कालीन ब्लाॅक घेतला जाईल. त्यामुळे प्रवाशांना ब्लॉकच्या मालिकेचा फटका प्रवाशांना बसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी रात्री १२.३० ते रात्री ३.३० दरम्यान तीन तासांचा भायखळा – सीएसएमटीदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गावर (दोन्ही स्थानक वगळून), अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील वडाळा रोड – सीएसएमटीदरम्यान (दोन्ही स्थानके वगळून) ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा कुर्ला, परळ, दादर आणि भायखळा स्थानकांपर्यंत धावतील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत धावतील.

मुख्य मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकल

सीएसएमटीवरून रात्री १२.१२ कर्जतसाठी लोकल सुटेल आणि कर्जत येथे रात्री २.३३ वाजता पोहोचेल.

डोंबिवलीवरून रात्री १०.४८ वाजता सीएसएमटीसाठी लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १२.१० वाजता पोहोचेल.

मुख्य मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकल

सीएसएमटीवरून पहाटे ४.४७ वाजता कर्जतसाठी लोकल सुटेल आणि कर्जत येथे सकाळी ७.०८ वाजता पोहोचेल.

सीएसएमटीवरून रात्री ३.२३ वाजता कल्याणसाठी लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ४.५६ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकल

सीएसएमटीवरून रात्री १२.१३ वाजता पनवेलसाठी लोकल सुटेल आणि पनवेल येथे रात्री १.३३ वाजता पोहोचेल.

पनवेलवरून रात्री १०.४६ वाजता सीएसएमटी लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १२.०५ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉक नंतरच्या पहिल्या लोकल

सीएसएमटीवरून पहाटे ४.५२ वाजता पनवेलसाठी लोकल सुटेल आणि पनवेल येथे सकाळी ६.१२ वाजता पोहोचेल.

वांद्रेवरून पहाटे ४.१७ वाजता सीएसएमटीसाठी लोकल सुटेल आणि वांद्रे येथे पहाटे ४.४८ वाजता पोहोचेल.

मडगाव-सीएसएमटी एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block at night on 28th and 29 january on central railway mumbai mumbai print news asj