मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या पायाभूत कामानिमित्त मंगळवारी सकाळी १०.३० ते सकाळी ११.४५ वाजेपर्यंत ब्लाॅक असेल. या ब्लाॅकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द होतील. तर, इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.
मंगळवारी वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक असल्याने गाडी क्रमांक ९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत चालवण्यात येईल. तर, वाणगाव ते डहाणू रोडची रेल्वे सेवा रद्द असेल. गाडी क्रमांक ९३०१४ रेल्वेगाडीची सेवा वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान रद्द असेल. गाडी क्रमांक ९३०१५ चर्चगेट-डहाणू रोड पॅसेंजर बोईसरपर्यंत चालवण्यात येईल. त्यामुळे बोईसर ते डहाणू रोड दरम्यान रद्द असेल. तसेच गाडी क्रमांक ९३०१६ रेल्वेगाडीची सेवा बोईसर ते डहाणू रोड दरम्यान रद्द असेल. तसेच ब्लाॅक कालावधीत लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्या उशिराने धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.
© The Indian Express (P) Ltd