मध्य रेल्वेच्या ठाणे- कल्याण आणि पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव-बोरीवली स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
 ठाणे- कल्याण दरम्यान ‘डाऊन’ धीम्या मार्गावर सकाळी ११ते दुपारी साडेतीनपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या मार्गावरील सर्व गाडय़ा जलद मार्गावरून चालविण्यात येतील. त्याचप्रमाणे हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या पनवेल, बेलापूर, वाशी गाडय़ा सकाळी १०.१२ वाजल्यापासून दुपारी २.४५ वाजेपर्यंत तर वाशीहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्य़ा गाडय़ा सकाळी १०.२० ते दुपारी ३.०४ वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. या दरम्यान हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे- पनवेल दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येतील.  
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव- बोरीवली दरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान सर्व गाडय़ा स्लो ट्रॅकवरून चालविण्यात येणार आहेत.

Story img Loader