मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रुळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल – दुरुस्ती करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई: गर्डर टाकण्यासाठी नाहूर – मुलुंडदरम्यान रात्रकालीन ब्लॉक; मेल- एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांचा वेळापत्रकावर परिणाम

मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील.

हेही वाचा >>>मध्य रेल्वेवर २७ फेब्रुवारी रोजी रात्रकालीन ब्लॉक; मुख्य मार्गावरील काही उपनगरीय सेवा रद्द, तर काही अंशतः सुरू राहणार

हार्बर रेल्वेवरील पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल / बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ – गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान अप – डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.