माटुंगा- मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर
कधी- सकाळी ११.३० ते. दुपारी ३.३०
परिणाम-माटुंग्याहून स. ११.२१ ते दु. ३.२५ या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाऊन धीम्या गाडय़ा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड या स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर येतील. विद्याविहार, कांजुर मार्ग व नाहुर स्थानकांवर डाऊन धिम्या गाडय़ाची सेवा उपलब्ध राहणार नाही. ठाण्याहून स. ११.२१ ते दु. ३.२५ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप जलद गाडय़ा त्यांच्या नियोजित थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर व कुर्ला या स्थानकांवर थांबतील. सीएसटी स्थानकावरून स. ११.१५ ते दु. २.५१ या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद गाडय़ा त्यांच्या नियोजित थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड या स्थानकांवर थांबतील.
कुर्ला- मानखुर्द अप व डाऊन मार्गावर
कधी- सकाळी ११ ते दुपारी ३
परिणाम- सीएसटी स्थानकावरून स. १०.२३ ते दु. ३.०१ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी स्थानकांसाठी सुटणाऱ्या डाऊन गाडय़ा आणि पनवेल/बेलापूर स्थानकावरून स. १०.२० ते दु. ३.०४ या वेळेत सीएसटी स्थानकासाठी सुटणाऱ्या अप गाडय़ा रद्द करण्यात येतील. तथापि, या कालावधीत सीएसटी- कुर्ला आणि मानखुर्द- पनवेल या मार्गावर विशेष उपनगरी गाडय़ा चालवल्या जातील.
मुंबई सेंट्रल- माहीम अप व डाऊन मार्गावर
केव्हा-
डाऊन धिम्या मार्गावर शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ४.४०
अप धिम्या मार्गावर शनिवार- रविवारच्या मध्यरात्री १.४५ ते पहाटे ४.१५. परिणाम- ब्लॉकच्या कालावधीत सर्व डाऊन धिम्या गाडय़ा चर्चगेट व माहीम दरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या गाडय़ा फलाटांच्या अनुपलब्धतेमुळे महालक्ष्मी, एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड या स्थानकांवर त्या थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवासी वांद्रे व मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान त्यांच्या स्थानकांसाठी विरुद्ध दिशेने प्रवास करू शकतात.
विरारहून मध्यरात्री १२.०५ वाजता सुटणारी गाडी, बोरिवली डाऊन गाडी माहीमला येईपर्यंत वरील तीन स्थानकांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी माहीम स्थानकावर थांबवून ठेवली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा