मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान जलद मार्गावर, तसेच हार्बर मार्गावर कुर्ला आणि मानखुर्ददरम्यान दोन्ही दिशेने रविवारी मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.
ठाणे आणि कल्याणदरम्यान जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या काळात मेगा ब्लॉक करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाडय़ा ठाणे ते कल्याण दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. हार्बर मार्गावर कुर्ला आणि मानखुर्ददरम्यान दोन्ही दिशेने सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आहे. या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेलदरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत. या मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे-नेरुळ/वाशी, तसेच मेन लाइनने प्रवासाची परवानगी दिली आहे.   

Story img Loader