लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळी माटुंगा आणि मुलुंड दरम्यानची जलद मार्गावरील लोकलसेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर येत्या रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटीहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंग्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हेही वाचा…. मुंबई : सागरी किनारा मार्गालगतच्या भराव जमिनीवरील नियोजनासाठी नगररचनाकारांकडून सूचना

हेही वाचा…. VIDEO: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर १०० वर्षांपूर्वी काळ्या पैशाविषयी म्हणाले होते की…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत

परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील, सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Story img Loader