मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वे : मुख्य मार्ग

●कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

●कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत.

●परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि यादरम्यान या लोकल सर्व स्थानकात थांबतील.

हेही वाचा >>> मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

हार्बर मार्ग

●कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर

●कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत.

●परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी/नेरूळ/पनवेल, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

हेही वाचा >>> Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”

पश्चिम रेल्वे

●कुठे : माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर

●कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत. ●परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block on central and western line for repair of railway tracks and signals system mumbai print news zws