अभियांत्रिकी कामे आणि देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉककाळात लोकल आणि रेल्वेगाड्या विलंबाने धावतील. तसेच मध्य रेल्वेवरील अनेक लोकल आणि पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>> सीमाशुल्क विभागातील सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली सुमारे १० कोटींची फसवणूक, तोतया सरकारी वकील महिलेसह चौघांविरोधात गुन्हा
मध्य रेल्वे
मुख्य मार्गिका
कुठे : ठाणे – कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका
कधी : दुपारी १ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे – कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे रेल्वेगाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावतील.
हेही वाचा >>> मुंबई : बेस्टच्या ‘चलो कार्ड’च्या तुटवड्यामुळे प्रवाशांची गैरसोय, उपक्रमातील अधिकाऱ्यांचे मात्र मौन
हार्बर मार्गिका
कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सकाळी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी लोकल रद्द असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव आणि १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत गोरेगाव/वांद्रे ते सीेएसएमटी वाजेपर्यंत लोकल रद्द असेल. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चावण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील. तसेच काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.