लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्गिका

कुठे : माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणारी आणि सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यामुळे या लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत.

आणखी वाचा-ॲन्टॉप हिलमध्ये जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी / वडाळा रोड ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

आणखी वाचा-लोकसभा निवडणूक निकालानंतर मुंबई शहरातही मद्यविक्री करता येणार

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली -गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १० त दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवली लोकलला हार्बर मार्गावरून चालवण्यात येईल. तसेच बोरिवली फलाट क्रमांक १ ते ४ वरून लोकलचे आगमन आणि प्रस्थान होणार नाही.

Story img Loader