मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी -कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल चालवविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी / नेरुळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Eat Right Station certification is awarded by FSSAI
रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’

कुठे : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ – दुपारी ३.२५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकल जलद मार्गावर धावतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा : वडाळा – परळदरम्यानच्या जलबोगद्याचे खणन पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास एप्रिल २०२६ ची मुदत

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.४० – दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी- चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव लोकल रद्द रद्द करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : मुंबईतील नाल्यांतून उद्दिष्टापेक्षा अधिक गाळ उपसा, पालिका प्रशासनाचा दावा; वडाळ्यामधील नाल्यातील तरंगता कचरा पुन्हा काढणार

पश्चिम रेल्वे

कुठे : माहीम – गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११ – दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – वांद्रे, सीएसएमटी / पनवेल – गोरेगाव आणि चर्चगेट – गोरेगाव दरम्यानच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.