लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या अखत्यारितील मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – ठाण्यादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकात थांबतील. तर, नाहूर, कांजूरमार्ग, विद्याविहार या स्थानकात थांबा नसेल.
आणखी वाचा-पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता
ट्रान्स हार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ / पनवेल ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असतील.
हार्बर मार्ग
कुठे : माहीम ते अंधेरी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वांद्रे अप आणि डाऊन, सीएसएमटी – गोरेगाव अप आणि डाऊन सर्व लोकल रद्द असतील. तसेच पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – गोरेगाव दरम्यान काही धीम्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.