मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवर येत्या रविवारी कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवर वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल उशिराने धावतील. पश्चिम रेल्वेवर ४ मे रोजी रात्री ११ पासून सांताक्रुझ ते माहिमदरम्यान अप जलद मार्ग आणि डाऊन हार्बर मार्ग, वसई रोड ते भाईंदरदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे:

कुठे- सांताक्रुझ ते माहिमदरम्यान अप जलद मार्ग आणि डाऊन हार्बर मार्ग, वसई रोड ते भाईंदरदरम्यान अप व डाऊन जलद मार्ग

कधी- ४ मे  रा. ११.०० ते स. ५.०० वा. अप जलद मार्ग आणि म.रा. १२.३० ते प. ४.०० वा. अप व डाऊन जलद मार्ग

परिणाम- वांद्रे स्थानकातील गर्डर पाडण्यासाठी सांताक्रुझ ते माहिमदरम्यान अप जलद मार्गावर व डाऊन हार्बरवर ब्लॉक घेण्यात येईल. सिग्नल व अन्य तांत्रिक कामांसाठीही वसई रोड ते भाईंदरदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

कुठे: कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी: ५ मे स. ११.२० ते दु. ३.५० वा.

परिणाम- अप जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाण दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्ग : कुठे- वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्गावर

कधी- ५ मे स. ११.१० ते दु. ४.१०

परिणाम- वडाळा ते मानखुर्ददरम्यानच्या लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

Story img Loader