मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या वेळेत हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

तर, काही लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ब्लाॅकमुळे बदलापूर – कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत रद्द असणार आहे. त्यामुळे राम नवमीच्या दिवशी रविवारी प्रवाशांना मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.

नेरळ येथील पायाभूत कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने ३० मार्च रोजी ब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, या दिवशी गुढीपाडवा असल्याने नेरळ ब्लाॅक रद्द करण्यात आला होता. मध्य रेल्वेने राम नवमीच्या दिवशी ब्लाॅक घेतल्याने आता प्रवाशांना मध्य रेल्वेवरून प्रवास करणे अडचणीचे होणार आहे. राम नवमीच्या दिवशी सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत.

परंतु, मेगाब्लाॅक घेतल्याने बदलापूर – कर्जत लोकल सेवा रद्द राहणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या इतर लोकल सुट्टीकालीन वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

बदलापूर – कर्जत, खोपोली लोकल प्रवास रद्द

या लोकल बदलापूरपर्यंत धावणार

  • सकाळी ९.५७ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल
  • सकाळी १०.३६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल
  • सकाळी ११.१४ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल
  • दुपारी १२.०५ वाजता सुटणारी ठाणे – कर्जत लोकल
  • दुपारी १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – खोपोली लोकल

अंबरनाथ ते कर्जत लोकल प्रवास रद्द

ही लोकल अंबरनाथपर्यंतच धावणार

  • सकाळी ९.३० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल

कर्जत – बदलापूर लोकल प्रवास रद्द

या लोकल बदलापूरवरून धावणार

  • कर्जत येथून सकाळी ११.१९ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल
  • कर्जत येथून दुपारी १२ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल
  • कर्जत येथून दुपारी १२.२३ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल
  • कर्जत येथून दुपारी १ वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल
  • कर्जत येथून दुपारी १.२७ वाजता सुटणारी कर्जत – ठाणे लोकल

कर्जत – अंबरनाथ लोकल प्रवास रद्द

ही लोकल अंबरनाथवरून धावणार

  • कर्जत येथून दुपारी १.५५ वाजता सुटणारी कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ स्थानकावरून चालवण्यात येईल.

कर्जत-पनवेल मार्गावरून रेल्वेगाड्या वळवणार

गाडी क्रमांक ११०१४ कोइम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१६४ चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२४९३ मिरज – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस कर्जत – पनवेल मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तसेच या गाड्यांना पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक २२१५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस दुपारी २.११ ते दुपारी २.३० पर्यंत वांगणी स्थानकांदरम्यान थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटे विलंबाने धावेल.