मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवस कालीन ब्लाॅक नाही.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.४७ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – वाशी/बेलापूर / पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – वांद्रे / गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : वसई रोड – भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत विरार – भाईंदर / बोरिवलीदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यावेळी काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत.