हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालाव्यात यासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस(सीएसटी) येथे शुक्रवारी सकाळपासून ७२ तासांचा महा-मेगाब्लॉक सुरू झाला आहे. आज दिवसभर हार्बर मार्गावरील ५९० फेऱ्यांपैकी १४८ म्हणजेच १८ टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. शनिवार-रविवार पूर्ण दिवस आणि सोमवारी ब्लॉक संपेपर्यंत हार्बर मार्गावरील गाडय़ा वडाळा ते सीएसटी यांदरम्यान पूर्णपणे बंद राहतील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी रविवारी मुख्य मार्गावर कोणताही मेगाब्लॉक न घेता गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर ७२ तासांचा मेगाब्लॉक सुरू
आज दिवसभर हार्बर मार्गावरील ५९० फेऱ्यांपैकी १४८ म्हणजेच १८ टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 19-02-2016 at 09:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block on harbour railway