मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल, जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुढील स्थानकावर लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीच्या अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांवर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजता
परिणाम : ब्लॉक कालावधीत गोरेगाव – बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.