लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरूस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी दोन दिवसीय रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नाही.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

आणखी वाचा- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…

परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली-गोरेगावदरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अंधेरी आणि बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वर कोणतीही लोकल सेवा उपलब्ध नसेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block on sunday on western railway mumbai print news mrj