तिन्ही रेल्वेमार्गावर रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मेगा ब्लॉक असल्याने आवश्यकतेनुसार प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम जंक्शन स्थानकांदरम्यान जलद मार्गावर दोन्ही दिशेने सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. जलद मार्गावरील वाहतूक सांताक्रूझ ते माहीम जंक्शन स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आली असून, काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे खार आणि वांद्रे स्थानकांदरम्यान असलेले १९ क्रमांकाचे फाटकही बंद ठेवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर भायखळा आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या काळात ब्लॉक करण्यात येणार असून, वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना परळ आणि घाटकोपर या स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार असून, पनवेल-वाशी-बेलापूरकडून येणाऱ्या गाडय़ा कुल्र्याच्या पुढे मेन लाइनच्या जलद मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जातील. या गाडय़ा करीरोड आणि चिंचपोकळी या स्थानकांवर थांबणार नाहीत.
वडाळा रोड ते माहीम जंक्शनदरम्यान हार्बरच्या दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे हार्बरवरील प्रवाशांना मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा