देखभाल आणि अन्य तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ९ मार्च रोजी मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे.
मध्यरेल्वेवर भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११. २० ते दुपारी ३. २० या कालावधीत हा मेगाब्लॉक असणार आहे. या वेळेत डाऊन धिम्या मार्गावरील उपनगरी गाडय़ा डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.   
हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते मशिद अप मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० आणि वडाळा रोड ते माहिम दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावर वांद्रे आणि अंधेरी येथे जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मध्य रेल्वेवर मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader