मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे: ल्ल कुठे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार धिम्या मार्गावर
- कधी – सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
- परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईदरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.