मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावरील विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे ब्लॉक घेणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे – कुठे : विद्याविहार ते ठाणे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या / येणाऱ्या डाऊन आणि अप मेल, एक्स्प्रेस, ठाणे ते विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर मार्ग – कुठे : हार्बर मार्गावर कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूर, वाशीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सीएसएमटी जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी यादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी, नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल. तर नेरुळ ते बेलापूर ते खारकोपर मार्गावरही ब्लॉक नसेल.
पश्चिम रेल्वे- कुठे : माहीम ते सांताक्रूझ डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत
परिणाम : पाच तासांच्या ब्लॉक काळात पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड येथे जलद लोकलचे फलाट नसल्याने येथे लोकल थांबणार नाही. तर, लोअर परळ, माहीम आणि खार रोड येथे फलाटांची रुंदी कमी असल्याने दोनदा लोकल थांबा असेल. तसेच डाऊन दिशेकडील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.