मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे : ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Story img Loader