मुंबई : मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर बोरिवली – भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग
कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंड येथून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
kalyan east marathi family case, immigrant family complaint, marathi family,
कल्याण पूर्वमध्ये मराठी कुटुंबानेही मारहाण केल्याची परप्रांतियांची तक्रार
Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली
Nilkamal boat accident Body of missing boy found in boat
नीलकमल बोट अपघात : बोटीतील बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला, मृतांचा आकडा १५
Mumbai western railway block
मुंबई : पश्चिम रेल्वेवर शनिवारी, मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक
smart Anganwadi Thane , Thane district new Anganwadi , 74 new smart Anganwadi ,
ठाणे : जिल्ह्यात यंदाच्या वर्षात ७४ नव्या स्मार्ट अंगणवाड्या
Satara district, four ministers, guardian minister post
चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेंच

हेही वाचा >>>मुंबई : अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणारी महिला अटकेत

हार्बर मार्ग

कुठे :पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असतील. ठाणे – पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान आणि बेलापूर / नेरूळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल सेवा सुरू असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली – भाईंदर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व धीम्या मार्गावरील लोकल सेवा विरार / वसई रोड – बोरिवली / गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. तर, विरार दिशेकडे जाणाऱ्या सर्व डाऊन धीम्या लोकल गोरेगाव – वसई रोड / विरार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नसेल.

Story img Loader