मुंबई : रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर दिवसकालीन कोणताही ब्लाॅक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र रविवारी दिवसकालीन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लाॅक घेऊन रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरूस्ती केली जाणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
ट्रान्स हार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी /नेरुळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी /नेरूळ / पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लाॅक नसेल.
पश्चिम रेल्वे
कुठे : माहीम ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रूझ ते चर्चगेटदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लाॅक नसेल.