मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लाॅकमुळे लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुख्य मार्ग

कुठे : ठाणे – कल्याणदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका

कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

परिणाम : लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल. सकाळी ९.५० वाजताची वसई रोड- दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येणार आहे. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.४५ वाजताची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल.

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल – ठाणे अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लोकल सेवा उपलब्ध असेल. बेलापूर / नेरुळ – उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका उपलब्ध असेल.