मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशी अप आणि डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर बोरिवली – जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

कुठे : ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
western railway mega block Mumbai
मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
diva vasai trains cancelled
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दिवा – कोपरदरम्यान वाहतूक ब्लॉक, दिवा – वसई रोड रेल्वेगाड्या रद्द करणार
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Heavy Vehicles Ban on Ghodbunder Road for metro work
घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकात थांबतील. तर, कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल कल्याण – ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – माहीमधील ‘त्या’ बांधकामावरील कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “धर्मांध मुस्लिमांनी…”

कुठे : कुर्ला- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी येथून पनवेल / बेलापूर / वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल आणि वाशी / बेलापूर / पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि वाशी – पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी / नेरुळ) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

हेही वाचा – जे.जे. रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया! २० कोटी खर्चाला तत्त्वत: मान्यता

कुठे : बोरिवली – जोगेश्वरी स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर

कधी : रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ दरम्यान

परिणाम : ब्लाॅक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच, या ब्लाॅकमुळे २५ मार्च रोजी अहमदबादहून सुटणारी गाडी क्रमांक १९४१८ अहमदाबाद – बोरिवली एक्स्प्रेस विरारपर्यंत चालवण्यात येईल.

Story img Loader