विविध यांत्रिकी कामांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर आणि हार्बरवर वडाळा रोड-मानखुर्द स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल विलंबाने धावणार आहे. रविवार साप्ताहिक सुट्टी आणि नाताळ असल्याने त्या दिवशी फिरायला जाणाऱ्याची संख्याही अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालिनी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक असेल. रविवारी या मार्गांवर मेगाब्लॉक होणार नाही. मात्र रविवार वेळापत्रक लागू असणार आहे.
हेही वाचा- करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंदिर व्यवस्थापन सतर्क; मुखपट्टीचा वापर करण्याचे भाविकांना आवाहन
रविवारी सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सीएसएमटी आणि घाटकोपरदरम्यान धीम्या मार्गांवरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. या दोन स्थानकांदरम्यान भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांत लोकल गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
हेही वाचा- मुंबई : भल्या पहाटे स्वच्छतेसाठी चौकीवर हजर राहणाऱ्या महिला सफाई कामगारांना दिलासा
हार्बरवर वडाळा-मानखुर्ददरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे ब्लॉक काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशीदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-वांद्रे, गोरेगावदरम्यान लोकल वेळापत्रकावर मात्र परिणाम होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. पनवेल-मानखुर्ददरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
हेही वाचा- मुंबई : मोडक सागर धरणाची दुरुस्ती ; धरण सुरक्षा संघटनेचा मुंबई महानगरपालिकेला अहवाल सादर
पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-माहीमदरम्यान दोन्ही जलद मार्गांवर २४ डिसेंबरच्या रात्री १२ ते २५ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल -माहीम स्थानकांदरम्यान आणि अंधेरी-सांताक्रूझदरम्यान लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक नाही.