मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा व पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक असल्याने, रविवारी दिवसकालीन ब्लाॅक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे – कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : रविवारी, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत मुलुंड – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकल सेवा उपलब्ध नसेल.
हेही वाचा – मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या
हार्बर मार्ग
कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी : रविवारी, सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी / वडाळा रोडवरून वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल बंद असतील. तर, ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे : वसई रोड यार्ड
कधी : शनिवारी, रात्री १२.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत